Retired Soldier | Nandedमध्ये निवृत्त सैनिकाची जंगी मिरवणूक, कुटुंबीयांना अश्रू अनावर
निवृत्त सैनिक भगवान मंगनाळे यांचे नांदेड(Nanded)मधील कवठा गावात ग्रामस्थांनी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गावात स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आले होते.
गाडीवरील छतावर रूबाबात उभा असलेला सेवानिवृत्त लष्करी जवान (Jawan) आणि डीजे(DJ)च्या तालावर ठेका धरणाऱ्या महिला भगिनी त्याचबरोबर फुलांचे हार घेऊन उभे राहिलेले संपूर्ण गाव. अशा अभूतपूर्व स्वागत मिरवणुकीत निवृत्त सैनिक भगवान मंगनाळे यांचे नांदेड(Nanded)मधील कवठा गावात ग्रामस्थांनी मिरवणूक काढून जंगी स्वागत केले. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गावात स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आले होते. महिलांनी सैनिक भगवान मंगनाळे यांचे औक्षण केले. लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र मंगनाळे यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. गावातून जल्लोषात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तर ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले. यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. अशा भव्य स्वागताने निवृत्त सैनिक भगवान मंगनाळे आणि त्यांचे कुटुंबीय भावुक झाले होते.