टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक, ‘नाणार’वरून सतीश सावंतांचे नितेश राणेंवर जहाल आसूड

| Updated on: Mar 31, 2022 | 4:45 PM

नाणार (Nanar) रिफायनरीवरून तळकोकणात राजकारण (Politics) तापलं असून नितेश राणे (Nitesh Rane) विरोधात शिवसेना असा जोरात सामना रंगला आहे. सुपारी देणे आणि दहशत माजवणे यापलीकडे नितेश राणेंचे व्हिजन नाही, असे जहाल आसूड सावंत यांनी नितेश राणेंवर ओढले आहेत.

नाणार (Nanar) रिफायनरीवरून तळकोकणात राजकारण (Politics) तापलं असून नितेश राणे (Nitesh Rane) विरोधात शिवसेना असा जोरात सामना रंगला आहे. नाणारवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यानंतर सतीश सावंत यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. रिफायनरी रद्द करायला लावणार, असे सांगणाऱ्या नितेश राणेंची भूमिका आता का बदलली? 2017-18मध्ये रिफायनरीला विरोध म्हणून नितेश राणेंनी लोकांना घंटानाद करायला लावला होता. रिफायनरीमुळे कॅन्सर होईल, आंबा, काजूला नुकसान होईल, अशी वक्तव्ये करणारे नितेश राणे जसे दोन दोन वर्षांनी पक्ष बदलता आहेत तशा भूमिका बदलत आहेत. भूमिका बदलून लोकांची दिशाभूल केल्यामुळे नितेश राणेंनी जाहीर माफी मागावी. नितेश राणे टायगर नाहीत तर भालू (अस्वल) आहेत. टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक. सुपारी देणे आणि दहशत माजवणे यापलीकडे नितेश राणेंचे व्हिजन नाही, असे जहाल आसूड सावंत यांनी नितेश राणेंवर ओढले आहेत.
Published on: Mar 31, 2022 04:44 PM
Mental Health Act: मेंटल हॉस्पिटलमध्ये वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या ‘अरुण’चं काय करायचं? बॉम्बे हायकोर्टाचे सरकारला जबाब मागितला
Aurangabad | औरंगाबाद जिल्ह्यात हर घर नल योजनेला गती, 537 गावांत नळ योजनांना मंजुरी, कसे मिळणार पाणी?