Shirur Crime News : धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर अंगावरचे दागिने अन् घर लुटलं
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बलात्कार आणि दरोड्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पुनः एकदा चर्चा सुरू झाली आहे.
तरुणीवर बलात्कार करत घरी दरोडा टाकल्याची संतापजनक घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. शिरूरमधल्या कारेगावमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. चाकूचा धाक दाखवून मारहाण देखील या आरोपींनी केली होती.
पीडित तरुणी आणि तिचा भाऊ हे रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी दोन व्यक्तींनी तिथे येत त्यांना चाकूचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केला होता. तसंच या दोघांना मारहाण देखील केली. त्यानंतर पीडित तरुणीच्या अंगावर असलेलं सोनं काढून घेतलं. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आता दोन आरोपींना अटक केलेली आहे. मात्र एकंदरीतच पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला बघता पोलिसांचा धाक संपला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published on: Mar 02, 2025 04:20 PM