Ratnagiri | रत्नागिरीत बैलगाडा शर्यतीचा धुरळा, Devrukh इथल्या साडवलीत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

| Updated on: Feb 20, 2022 | 3:19 PM

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पहिली बैलगाडी शर्यत (Bullock cart race) नुकतीच पार पडली. संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील (Devrukh) साडवलीत प्रद्युम्न माने यांनी जिल्ह्यातील पहिलीच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित केली गेली.

बैलगाडा शर्यतवरील बंदी उठल्यानंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पहिली बैलगाडी शर्यत (Bullock cart race) नुकतीच पार पडली. संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील (Devrukh) साडवलीत प्रद्युम्न माने यांनी जिल्ह्यातील पहिलीच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित केली गेली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साडवलीच्या माळ रानावरील ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक सहभागी झाले. जवळपास 80 बैलगाडा राज्यच्या कानकोपऱ्यातून सहभागी झाल्या आहेत. 970 मीटर इतके अंतर कमीत कमी वेळात पार करणे क्रमप्राप्त असणार होते. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्यातील ही पहिलीच बैलगाडा शर्यत होती. त्याला मिळालेला प्रतिसाद देखील तितकाच चांगला होता. विविध ठिकाणांहून हौशी बैलगाडा मालक याठिकाणी आले होते. बंदी उठवल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याने एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.

मी रायगडचा जावई, उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा हिशोब देणार आणि घेणार-किरीट सोमय्या
पाहा video| हातात भगवा धरत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील डीजेवर थिरकले !