Nanded Bicycle | भंगारातून देशी जुगाड, चक्क पोरासाठी बनवली मोटारसायकल

| Updated on: Feb 11, 2022 | 4:02 PM

नांदेडच्या (Nanded) हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील उमेश महाजन यांनी जुगाड (Jugaad) करून आपल्या मुलासाठी मोटारसायकल (Bicycle) बनविलीय. उमेश महाजनांच्या या हटके जुगाडाची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे.

नांदेडच्या (Nanded) हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथील उमेश महाजन यांनी जुगाड (Jugaad) करून आपल्या मुलासाठी मोटारसायकल (Bicycle) बनविलीय. उमेश महाजन हे मागील काही वर्षापासून मोटरसायकल दुरुस्तीचे काम करतात. त्यांच्या मुलाने बाबा मला पण गाडी पाहिजे, हा हट्ट धरला. मग त्याच्यासाठी वडिलांनी भंगारच्या साह्याने  मोटरसायकल बनवलीय. यासाठी त्यांना 10 ते 12 हजार रुपये खर्च आला असून ही मोटारसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये  50 ते 55 किलोमीटर धावते. ही गाडी पाहण्यासाठी आजूबाजूचे नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. सध्या त्यांनी पेट्रोलवर चालणारी गाडी बनवली असून यापुढे प्रदूषण होणार नाही आणि पैश्याची बचत होईल, यासाठी ई-सायकल बनवण्याची संकल्पना असल्याचे उमेश यांनी सांगितले आहे. उमेश महाजनांच्या या हटके जुगाडाची परिसरात सर्वत्र चर्चा होत असून त्यांनी बनवलेली दुचाकी चालवण्याची इच्छाही व्यक्त करत आहेत.
Pune Electriciy Failure : पुणे, पिंपरीसह राज्यात सातत्याने बत्ती गुल, कारणं आणि उपाय काय?
Photo Gallery: ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय’, सोमय्या आत, कार्यकर्ते पायरीवर