Aurangabad | बियर शॉपी फोडून लांबवल्या लाखोंच्या बाटल्या, चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद
बियर शॉपी (Beer) फोडून चोरट्यांनी (Thieves) लाखो रुपयांच्या बियर बाटल्या लांबवल्या आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील जोगेश्वरी परिसरातील हा प्रकार आहे. बियर शॉपीच्या छतावरील पत्रे उचकटून अनेक बॉक्स चोरट्यांनी लांबवले आहेत.
बियर शॉपी (Beer) फोडून चोरट्यांनी (Thieves) लाखो रुपयांच्या बियर बाटल्या लांबवल्या आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील जोगेश्वरी परिसरातील हा प्रकार आहे. बियर शॉपीच्या छतावरील पत्रे उचकटून अनेक बॉक्स चोरट्यांनी लांबवले आहेत. दरम्यान, चोरीची ही घटना आणि बियरचे बॉक्स पाळणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. लाखो रुपयांचे बियर बॉक्स पाळणारे चोरटे मात्र अजूनही मोकाटच आहेत. या घटनेत बियर शॉपी चालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले चोरटे स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी हे फुटेज व्यवस्थित तपासून यातील चोरट्यांचा तत्काळ शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून पोलिसांनी चोरट्यांवर वचक निर्माण करावा, अशीही मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.