Video | वेदांताचा राजकीय वाद पेटला, मुंबई-पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक, युवासेनेची राज्यभरात स्वाक्षरी मोहीम
युवासेनेतर्फे राज्यभरात वेदांता प्रकरणी स्वाक्षरी मोहीम सुरु आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या खोके सरकारचा निषेध.. असा आशय असलेल्या बॅनर्सवर तरुणांकडून स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत.
मुंबईः वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत नेण्यावरून राजकीय वाद चांगलाच पेटलाय. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Leaders) नेत्यांनी आंदोलन केलं. तर पुण्यातही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुंबईत मंत्रालयाकडे जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तर पुण्यातही सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धारलं. महाराष्ट्रात वेदांतापेक्षा चांगला प्रकल्प आणायचं आश्वासन देताय पण आम्हाला हाच प्रकल्प पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.
युवासेनेतर्फे राज्यभरात वेदांता प्रकरणी स्वाक्षरी मोहीम सुरु आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या खोके सरकारचा निषेध.. असा आशय असलेल्या बॅनर्सवर तरुणांकडून स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत.