इंडिया आघाडी संत्र्यासारखी, निकाल येताच एक एक साल गळून पडेल; अमित शाह यांची जोरदार टीका

| Updated on: Feb 27, 2024 | 11:34 PM

इंडिया आघाडी नव्हतंच. ते मीडियाचं क्रिएशन होतं. मी देशातील लोकांना सांगतो. कुठेच इंडिया आघाडी झालं नाही. इंडिया आघाडीतील दोन सदस्य केरळात निवडणूक लढत असल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केल्या.

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या कार्यक्रमात काँग्रेससह इंडिया आघाडीवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय, स्टॅलिन यांनाही मुलगा मुख्यमंत्री व्हावा वाटतोय. ममता बॅनर्जी यांनाही भाचीला सत्तेत आणायचं आहे. लालूंनाही तेच करायचं आहे. यात आघाडी कुठे आहे. या लोकांना आपल्या कुटुंबाला सत्तेत आणायचं आहे. त्यासाठी हा परिवारवादी जमावडा आहे. संत्र्यासारखी आघाडी आहे. या संत्र्याची एक एक पाकळी निघून जाणार आहे. 2024च्या निकाल येताच सर्व पळून जातील. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल. राहुल गांधी नेते नसते तर आम्ही जिंकलो असतो असं सर्व म्हणतील.

 

Published on: Feb 27, 2024 11:34 PM
असा सापडला ‘गद्दार एजंट’, ISI कडे फोडायचा गुप्त माहिती, आर्मीमध्ये चालवायचा कॅन्टीन
काँग्रेस सरकार संकटात, एका महत्त्वाच्या राज्यात महाराष्ट्रासारख घडू शकतं