Rajya Sabha Election | मविआच्या प्रस्तावानंतरही भाजप निवडणूक लढण्यावर ठाम

| Updated on: Jun 03, 2022 | 12:48 PM

सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ, सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं.

राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता निवडणूकीतून माघार नाहीच, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचाही भाजपमधील सूत्रांकडून करण्यात आलाय. राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अशातच भाजप उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही, असं सांगितलं जातंय.

Published on: Jun 03, 2022 12:47 PM
Rajya Sabha Election: तर निवडणूक होणारच, पक्षश्रेष्ठींही म्हणाले, यू गो विथ दॅट स्टँड; चंद्रकांतदादांनी एका वाक्यात राज्यसभेचा निकाल लावला
Wardha Zilla Parishad | वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर; पाच गट आणि दहा गणांची वाढ