आता पेंग्विन विरुद्ध चित्ते वाद, अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंचा प्रश्न काय?
सध्या विरोधक बावचळलेल्या स्थितीत आहेत, म्हणून असे आरोप करत आहेत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केलंय.
मुंबईः राज्याच्या राजकारणात आता पेंग्विन (Penguin) विरुद्ध चित्ते (Cheetah) असा नवाच वाद सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसाला नामिबियातून आणलेल्या चित्त्यांवर देशाचं लक्ष केंद्रित झालंय. चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत प्राणी सोडले जात आहे. मात्र चित्ते आणल्याने मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. वेदांता सारखे प्रकल्प राज्याला हवेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का, असा सवाल त्यांनी केलाय. आज मुंबई, महाराष्ट्राची काय स्थिती आहे…. राज्याचा विकास नव्याने सुरु आहे. सध्या विरोधक बावचळलेल्या स्थितीत आहेत, म्हणून असे आरोप करत आहेत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. तेव्हापासून पेंग्विनसाठी लागलेल्या खर्चावरून भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.