नारायण राणेंकडून ‘जुहूबीच’वर स्वच्छता मोहीम; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त जनतेला दिला ‘हा’ खास संदेश

| Updated on: Sep 17, 2022 | 10:15 AM

नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जुहूबीचवर साफसफाई अभियान राबवलं. यावेळी त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधताना जनतेला खास संदेश दिला आहे.

मुंबई : आज 17 सप्टेंबर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील भाजपचे नेते विविध सामाजिक कार्यक्रम राबवून मोदींचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जुहूबीचवर साफसफाई अभियान राबवलं. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला.  त्यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त जनतेला खास संदेश दिला आहे. स्वच्छता मोहीमेमध्ये सहभाग घ्या, मुंबई, महाराष्ट्र, देश नेहमी स्वच्छ ठेवा, पर्यावरण अतिशय चांगले ठेवून लोकांचे आयुष्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न करा, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 17, 2022 10:15 AM
‘आदित्य ठाकरेंच्या दापोलीतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी, दीड-दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही!’
सोनिया, इंदिरा गांधींनाही भूरळ पाडणाऱ्या नंदूरबारमधून सलग 45 वर्ष विजयी; माणिकराव गावितांचे हे किस्से माहीत आहेत काय?