कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची रॅली; रॅलीत मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत आले रे आले गद्दार आले अशा घोषणा देण्यात आल्या.
पुणे : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिंदे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले. शिंदे हे कसब्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शोमध्ये सहभागी झाले होते. कसब्यात हेमंत रासने यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर रिंगणार आहेत. रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला. यावेळी शिंदे यांनी गळ्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे चिन्ह असलेले उपरणे घातले होते. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली होती. या रॅलीत आले रे आले गद्दार आले, अशी घोषणा देण्यात आली. घोषणा देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत आले रे आले गद्दार आले अशा घोषणा देण्यात आल्या.
पुण्यात दिग्गज प्रचारासाठी तळ ठोकून
भाजप आणि शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेते पुण्यात या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. भरत गोगावले, प्रवीण दरेकर हेही या प्रचार रॅलीत उपस्थित होते. २६ फेब्रुवारीला या निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी निकाल लागेल. प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. पाच वाजेपर्यंत प्रचार करण्यात आला. त्यामुळे मोठ-मोठ्या दिग्गजांनी या प्रचार सभांना हजेरी लावली.
आदित्य ठाकरे यांनी दिल्या या घोषणा
दुसरीकडे ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनीही आज शेवटच्या दिवशी प्रचाराला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. तर, चिंचवड पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आहेत. नाना काटे यावेळी म्हणाले, भाजप सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार करत आहे. भाजपचा स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेताना पकडण्यात आला. फडणवीस यांनी चिंचवडमध्ये येऊन सांगितलं होतं की, १०० दिवसांत या शहराचे प्रश्न मार्गी लावतो. शास्तीकर, अनधिकृत बांधकाम आणि पाण्याचा प्रश्न आहे. या घटनेला सहा वर्षे झाली असून, अद्याप एकही प्रश्न मार्गी लावण्यात आलेलं नाही. सतत खोटं बोलण्याचा यांचा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जोरात आरोप प्रत्यारोप करण्यात आले.