Nagpur Hanuman Chalisa Pathan | हनुमान मंदिरात राणा दाम्पत्यांकडून हनुमान चालिसा पठण, थेट

| Updated on: May 28, 2022 | 4:09 PM

राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह केला होता. त्यामुळं राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले. तुरुंगवारी संपल्यानंतर राणा दाम्पत्य हे दिल्लीमध्ये होते.  नवनीत राणा व आमदार रवी राणा नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पावणे एक वाजता दाखल झाले. पोलिसांनी विमानतळावर राणा दाम्पत्यांशी चर्चा केली. त्यानंतर नवनीत राणा, रवी राणा यांचं नागपूर येथे स्वागत करण्यात आले.नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे, यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहेत.

Published on: May 28, 2022 04:07 PM
Sambhaji Chhatrapati : संभाजी छत्रपती अपक्ष लढण्याच्या खेळीमागे फडणवीसच, संभाजीराजेंच्या वडिलांचा मोठा खुलासा; घराण्याच्या अवमानावर म्हणाले…
Nana Patole | समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांचा पोपट; नाना पटोले म्हणतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही