मुरजी काका 100% निवडून येणार, शिंदे गटाच्या आमदारांचा दावा पाहा!
बाळासाहेबांची शिवसेना घेऊन आम्ही लोकांसमोर आहोत. ज्यांनी राष्ट्रवादी-काँग्रसचे विचार घेतले. गद्दारी केली, त्यांना लोकं दाखवून देतील, असं वक्तव्य दिलीप लांडे यांनी केलंय.
अक्षय मंकणी, मुंबईः अंधेरी पूर्व (Andheri East) विधानसभा मतदार संघातून अनेक वर्षे सेवा देणारे मुरजी काकाच शंभर टक्के निवडून येणार, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी व्यक्त केलाय. त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. मतदार येणाऱ्या 3 तारखेला कुणाला आशीर्वाद द्यायचा, हे दाखवून देतील. मुरजी पटेल (Muraji Patel) अनेक वर्षांपासून सेवा करतायत. महायुतीचा उमेदवार 100 टक्के निवडून येतील, अशी मी खात्री देतो, असं आमदार लांडे म्हणाले. खोक्यांचा आरोप सातत्याने होतोय, यावर दिलीप लांडे म्हणाले, ज्याने चुकी केली असते, त्याला हे शब्द लागतील. आमच्याकडून अशी चुकी झालेली नाही. गद्दारी केली नाही. बाळासाहेबांची शिवसेना घेऊन आम्ही लोकांसमोर आहोत. ज्यांनी राष्ट्रवादी-काँग्रसचे विचार घेतले. गद्दारी केली, त्यांना लोकं दाखवून देतील, असं वक्तव्य दिलीप लांडे यांनी केलंय.