Nana Patole on Uddhav Thackeray | नाना पटोलेंची अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका? पहा व्हिडीओ

| Updated on: May 23, 2022 | 2:54 PM

आज मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत मविआमधील धुसफूसीवर खलबतं होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.मुंबई ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thacekray) यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या ओबीसी (OBC) विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केलीय. याच दरम्यान आज मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत मविआमधील धुसफूसीवर खलबतं होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.मुंबई ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेऊन नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे.नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं की,  फडणवीस सरकार असताना 2017 पासून राजकीय अधिकारांवर घाला घालण्यात आला.म्हणून महाराष्ट्रातील ओबीसी समाजात आक्रोश आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल आणि ओबीसी संघटनेनी निवेदन मला दिले ते मी मुख्यमंत्र्यांना पाठवले. राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल बाबत भूमिका मांडली, ते त्यांना आवडतात त्यांनी ठेवावा,  पण उद्याच्या सुप्रिम कोर्टाच्या निकाल मध्ये किंतू परंतु येता काम नये.  ओबीसी समाजाच्या अधिकारावर घाला घालू नये. असं कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. ओबीसी समाजाच्या अधिकारांवर घाला येऊ नये, असं पटोलेंनी म्हटलं आहे.  मुख्यमंत्र्यांना ते पाहिजेत त्याला आमचा विरोध नाही.  त्यांना बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला आहे, असंही ते यावेळी  म्हणाले.

Published on: May 23, 2022 02:47 PM
हज यात्रा ही नफा कमावण्यासाठी नाही, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, वाचा काय आहे प्रकरण
Nana Patole | आघाडीत आणखी बिघाडी? राष्ट्रवादीनंतर पटोलेंच्या टार्गेटवर शिवसेना , OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा