Gunratna Sadavarte On Anil Parab | सदावर्तेनी उडवली अनिल परबांची खिल्ली
जे होतंय ते योग्य होत आहे. असं म्हणत ऍड. गुणरत्न सदावर्तेंनी लाडू वाटप करत आनंद व्यक्त केला आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अनिल परब यांच्या संबंधित असलेले त्याचे निकटवर्तीय ही ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. तर यावेळी ऍड. गुणरत्न सदावर्तेंना प्रचंड अनंद झाला आहे. जैसी करनी वैसी भरनी असं गात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्याची जशी करनी त्याची तशी भरनी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी अनिल परब यांच्यावरील कारवाईचे समर्थन केलं आहे. इतकंच नाही, तर त्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला आहे. जे होतंय ते योग्य होत आहे. असं म्हणत त्यांनी लाडू वाटप करत आनंद व्यक्त केला आहे.
Published on: May 26, 2022 03:04 PM