विजय शिवसेनेचाच; आमचं नियोजन झालंय, संजय पवारांचा दावा

| Updated on: Jun 10, 2022 | 9:30 AM

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे नियोजन झाले आहे. विजय शिवसेनेचाच होईल असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मात्र या मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी  मतांचा कोटा बदलला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी केलेल्या या बदलामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांची मते धोक्यात आल्याचे बोलले जात आहेत. मात्र दुसरीकडे विजय शिवसेनेचाच होईल, आमचं पूर्ण नियोजन झाल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी केला आहे.

Published on: Jun 10, 2022 09:30 AM
एकेक मत महत्त्वाचे, पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप कार्डियाक एम्ब्युलन्समधून विधानभवनाकडे
 Rajyasabha Election | पवारांनी कोटा वाढवल्याच्या वृत्तावर राऊत म्हणतात, मुख्यमंत्री अजिबात नाराज नाहीत!!