Vidarbha | खरीप पेरणी तोंडावर असताना कर्मचारी दीड ते दोन तास उशिरा पोहोचले
खरीप पेरणी तोंडावर असताना कृषी विभागाचे कर्मचारी दिड ते दोन तास कामावर उशीरा पोहचत आहेत.
विदर्भात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा लेट लतिफ कारभार उघड झाला आहे. अमरावती, नागपूर, कृषी विभागातील लेटलतिफ कारभार उघड झाला आहे. खरीप पेरणी तोंडावर असताना कृषी विभागाचे कर्मचारी दिड ते दोन तास कामावर उशीरा पोहचत आहेत. आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी हा लेट लतिफ कारभार पाहिला आहे. याअशा लेट लतिफ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यांनी या कार्यलयाचं शुटींग केलं तेव्हा सकाळचे सव्वा अकरा वाजले होते. तरीही तिथे 90 टक्के कर्मचारी हे कामावर आलेले नव्हते. ज्या कृषी विभागावर शेतकऱ्याचं जगणं अवलंबून आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. असं असतानाकर्मचारी दीड ते दोन तास उशीरा कार्यालयात पोहचतात. अमरावती आणि नागपूर येथील विभागीय कृषी कार्यालयातला लेटलतीफपणा टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. 9.30 चा ॲाफीस टाईम असताना नागपूरातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. 10.40 पर्यंत 80 टक्के कर्मचारी कार्यालयात पोहचलेले नाहीत. नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील वास्तव समोर आणले आहे.