दीड कोटीचा रेडा, खासदार उदयनराजे भोसले यांना मोह आवरला नाही आणि…
सातारा येथे कृषी प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात दीड कोटीचा रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. हा रेडा पाहून ते चकित झाले आणि त्यांनी...
सातारा | 19 ऑक्टोंबर 2023 : सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेतीविषयक लागणारी विविध अवजारे, उच्च जातीचे गुरे, विविध जातीचे बियाणे ठेवण्यात आली आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या कृषी प्रदर्शनास भेट दिली. त्यावेळी त्यांचे लक्ष एका रेड्याने वेधले. दीड कोटी रुपयांचा हा रेडा कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी हा रेडा पाहिला आणि ते देखील चकित झाले. दीड कोटीच्या रेड्यासोबत फोटोसेशन करण्याचा मोह खासदार उदयनराजे भोसले यांना आवरता आला नाही. त्यांनी त्या रेड्यासोबत स्वत: फोटो सेशन केलं. दीड कोटीचा हा रेडा पाहण्यासाठी लोकांची कृषी प्रदर्शनात एकच झुंबड उडालीय.
Published on: Oct 19, 2023 03:55 PM