10 ग्राम ते 150 किलो एमडी ड्रग, ललित पाटील 15 वा आरोपी, पोलिसांची आतापर्यंतची कारवाई काय?
ललित पाटील याच्यावर पुण्यात पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. तर मुंबई पोलिसांची केस ड्रग्ज प्रकरणातली आहे. भूषण पाटील हा आमचा पुढील आरोपी आहे. त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी करणार आहोत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय.
मुंबई | 18 ऑक्टोंबर 2023 : साकीनाका पोलिसांनी एमडी ड्रग प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपीना अटक केली आहे. ललित पाटील हा 15 वा आरोपी आहे. त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 10 ग्रामपासून हा तपास सुरु झाला होता. त्यानंतर नाशिकमध्ये ड्रग्ज फॅक्टरीमध्ये कारवाई झाली. ललित पाटील याचा यामध्ये रोल होता. आम्ही त्याचा शोध घेत होतो. आतापर्यंत 150 किलो एमडी ड्रग्ज ज्याची किमंत ३०० कोटी इतकी आहे ते जप्त करण्यात आले आहे. चेन्नई बंगळुरू हायवेवर आम्ही कारवाई करून ललित पाटील याला अटक केली. भूषण पाटील याच्या ड्रग्स फॅक्टरीवर रेड केली होती. अनवर सय्यद हा पहिला आरोपी होता. त्यानंतर अनेक ठिकाणी रेड केल्या आणि ही सगळी कारवाई केली असे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
Published on: Oct 18, 2023 10:12 PM