शिंदे गटाचे हे 10 आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतणार?, या व्यक्तीने केला दावा

| Updated on: Mar 15, 2024 | 3:08 PM

एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी मोठी बंडखोरी करीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेत भाजपासोबत सरकार स्थापन केले. परंतू आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत भ्रमनिरास झाल्याने शिंदे गटातील दहा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात परतणार असल्याचा मोठा दावा एका सभेत करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रपूर | 15 मार्च 2024 : शिवसेनेत मोठी फूट घडवून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. मात्र आता त्यापैकी दहा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याचा दावा ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी चंद्रपुरातील निर्भय बनोच्या सभेत केल्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांना ठाण्यााच्या पलिकडे कोणी ओळखत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले काही भवितव्य नसल्याचे या आमदारांना कळल्याने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे कडे यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही सरोदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी या घरवापसी करणाऱ्या आमदारांची नावेच वाचून दाखविली. यात श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे आणि प्रकाश आबिटकर या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Published on: Mar 15, 2024 03:07 PM
प्रदुषण रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा क्रांतीकारी निर्णय, लालपरी एलएनजीवर धावणार
Video | पुण्यात आपलाच हातोडा चालणार, वसंत मोरे यांना आत्मविश्वास