युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या झालेल्या मृत्यूने हळहळ

| Updated on: Nov 16, 2024 | 1:17 PM

युपीतील झॉंशी येथील महाराणी लक्ष्मी बाई मेडिकल कॉलेजा रुग्णालयातील बालकांच्या वॉर्डला काल रात्री अचानक आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

युपीतील झॉंशी येथील महाराणी लक्ष्मी बाई मेडिकल कॉलेजा रुग्णालयातील बालकांच्या वॉर्डला काल रात्री पावणे अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत 16 बालकांची मृत्यूशी झुंज सुरु असून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या रुग्णालयात 54 नवजात बालकांना एनआयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आले होते. काल रात्री शॉर्ट सर्कीटने आग लागल्यानंतर 44 बालकांची सुटका करण्यात यश आले. दहा बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील 7 बालकांची ओळख पटलेली आहे. उर्वरित बालकांच्या मृतदेहाची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरला शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता युपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले.

 

 

Published on: Nov 16, 2024 01:14 PM
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण…काय म्हणाले शरद पवार
भाजपचे पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवार यांनी केला व्हिडीओ ट्वीट