Maharashtra Board SSC Result 2023 Date : गुलाल, पेढे तयार ठेवा! उद्याच लागणार दहावीचा रिझल्ट; कुठे आणि कसा पाहू शकता निकाल?
12 वी च्या निकालात मुलीच सर्सस ठरल्या होत्या. त्यानंतर अनेक पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष हे आता 10 चा निकालाकडे लागलं होतं. त्याचीही प्रतिक्षा आता संपली आहे. 10 वी चा निकाल आता उद्याच म्हणजे 2 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कमालिची उत्सुकता पहायला मिळत आहे.
मुंबई : गेल्या दोन एक आठवड्या आधीच 12 वी चा निकाल लागला होता. त्यावेळी राज्याचा निकाल चांगला लागला होता. तर राज्यात कोकण विभागाने बाजी मारली होती. तर 12 वी च्या निकालात मुलीच सर्सस ठरल्या होत्या. त्यानंतर अनेक पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष हे आता 10 चा निकालाकडे लागलं होतं. त्याचीही प्रतिक्षा आता संपली आहे. 10 वी चा निकाल आता उद्याच म्हणजे 2 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कमालिची उत्सुकता पहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत घोषणा केली आहे. तर उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकता.