अखेर प्रतीक्षा संपली! HSC चा निकाल आज हातात, केव्हा व कोठे पाहता येणार

| Updated on: May 25, 2023 | 9:53 AM

बारावीचा निकाल आज 25 मे, गुरूवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह पालकांचं सारं लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या (12th Result) निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज 25 मे, गुरूवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह पालकांचं सारं लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. Maharesult.nic.in, hsc.maharesult.org.in, hscresult.mkcl.org या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. तर SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर निकाल पाहता येईल. तर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घेऊ शकता.

Published on: May 25, 2023 09:53 AM
“नाना पटोले ते राष्ट्रवादी, अहो ठाकरे परिस्थिती पाहून ताबडतोब निर्णय घ्या”, प्रकाश आंबेडकर यांनी दिला सल्ला
धुळेकरांना आता हरणमाळ धरणाचाच आधार? काय आहे कारण? नकाने तलावाचं काय झालं?