Breaking | राज्यातील सत्तांतरणाचे पुण्यात पडसाद! मविआचे 20 नगरसेवक भाजपाच्या संपर्कात-TV9
हा फटका फक्त शिवसेनेलाच नाही तर हा फटका महाविकास आघाडीलाही बसण्याची दाट शक्यता आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्याचं आव्हान हे आता महाविकास आघाडीसमोर असणार आहे.
पुणे : राज्यात घडून आलेल्या सत्तांतराने संपूर्ण देशाचे लक्षवेधून घेतलं आहे, या सत्तांतराने शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, ठाकरे सरकार पायउतार झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. पण त्यानंतर आता महाविकास आघाडीची समीकरणे ही बदलताना दिसत आहेत. कारण पुण्यातले अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा फटका फक्त शिवसेनेलाच नाही तर हा फटका महाविकास आघाडीलाही बसण्याची दाट शक्यता आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्याचं आव्हान हे आता महाविकास आघाडीसमोर असणार आहे.
Published on: Jul 18, 2022 09:15 AM