लोकसभा निवडणूकांत 20 विद्यमान खासदारांचा पराभव, भाजपाच्या तीन मंत्र्यांचाही सहभाग

| Updated on: Jun 05, 2024 | 2:19 PM

लोकसभा 2024 च्या निवडणूकांमध्ये विद्यमान 20 खासदारांचा पराभव झाला आहे. त्यात भाजपाच्या तीन विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे.

Follow us on

लोकसभा निवडणूकांत 20 विद्यमान खासदारांचा पराभव झाला आहे. यात भाजपाच्या तीन मंत्र्यांचाही समावेश आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री भारती पवार, कपिल पाटील, अमरावतीतून नवनीत राणा, नगरमध्ये भाजपाचे सुजय विखे, रत्नागिरी-सिंधुदुर्गातून विनायक राऊत, नाशिकमधून हेमंत गोडसे, ठाण्यातून राजन विचारे, संभाजीनगरातून इम्तियाज जलील, सांगलीतून संजयकाका पाटील, माढातून रणजित निंबाळकर, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, लातूरमधून सुधागर श्रुंगारे, नंदुरबारमधून हिना गावित, भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे, वर्ध्यातून रामदास तडस, गडचिरोलीतून अशोक नेते, मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, कोल्हापूरात संजय मंडलिक अशा 20 विद्यमान खासदारांचा पराभव झाला आहे.