Irshalwadi Landslide | “लाईट नव्हती, अंधार होता, भिंती कोसळतील तसा आवाज होत होता आणि आम्ही पळत होतो”

| Updated on: Jul 22, 2023 | 10:42 AM

इर्शाळवाडीत दरड कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत.

रायगड | 22 जुलै 2023 : राज्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत दरड कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. यादरम्यान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. ते पंचायत मंदिरात बचावलेल्या ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत. मात्र आज चौथ्या दिवशीही तेथील नागरिक हे शोकग्रस्त असून अनवेकांना त्यांच्या नातेवाईकांच्या आठवणी सतावताना दिसत आहे. यावेळी एका नातेवाईकाने दुर्घटनेच्या दिवशी काय झालं हे सांगितलं. यावेळी त्यांने सांगितले की रात्री वाडीवर लाईट नव्हती, तर सगळीकडे काळोख होता. पण जेंव्हा ही घटना घडली तेंव्हा भींती पडण्याचे आवाज फक्त येत होते. त्यामुळे जे मिळतील त्यांना घेऊन पळालो. आम्ही शेताकडे पळालो. मात्र गावाच्या मध्यभागी असणाऱ्या मोठ्या आणि दुसऱ्या भावांच्या कुटुंबाची वाताहात झाली. मोठ्या भावाच्या कुटुंबात ८ सदस्य होते. मात्र फक्त एक मुलगा वाचला. तर दुसऱ्या भावाच्या घरातील एक मुलगा गेला इतर सगळे जखमी झाल्याचं त्यानं म्हटलं आहे. याचबरोबर त्यांने आणखीन काही आपबीती सांगितली जे हृदय पिळवटून टाकणारं आहे. पहा काय झालं त्या काळरात्री इर्शाळवाडीत…

Published on: Jul 22, 2023 10:42 AM
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकत्व स्वीकारणार !
“शेतीसाठी तो खाली आला अन्…”, दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला हृदय पिळवटून टाकणार घटनाक्रम