राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी, शिंदे गटासह ठाकरे गटाचा विश्वास, पाहा काय आहेत 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये अपडेट
धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असतानाच शिंदे गटाकडून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आमचेच असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर शिंदे गट उद्धव ठाकरे गट, भाजपसह राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर आता खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर देखिल सुनावणी आहे. सध्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे.
धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असतानाच शिंदे गटाकडून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आमचेच असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी केली आहे.
तर बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख पद आपल्याकडे घेणे हे बेकायदेशिर असल्याचे शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी म्हटलं आहे. याबातम्यांसह पाहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये राज्यातील अपडेट