इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहचला 24 वर; अजही मदत आणि बचावकार्य सुरू
तसेच राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
रायगड | 22 जुलै 2023 : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे रायगडमध्ये मोठी दुर्घटना झाली. येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य आज चौथ्या दिवशी देखील सुरू आहे. आतापर्यंत 110 नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही 70 ते 80 नागरिकांचा शोध लागलेला नाही. तसेच राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. दुर्घटनास्थळ उंचावर असल्याने आणि तिथे पोहचण्याचा मार्ग नाही ज्यामुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत. यादरम्यान इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली. तसेच त्यांनी मुलांशीही साधला. तर दुर्घटनाग्रस्त मुलांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले असून त्यांनी दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.