राज्य शासन मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार, पहा राज्यातील नव्या घडामोडी 25 महत्वाच्या बातम्यामध्ये

| Updated on: Oct 18, 2022 | 8:04 PM

पुण्यात नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली 34 गावं ही वगळण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर ही गावे वगळ्याचा डाव शिंदे-भाजप सरकारने केल्याचाही आरोप ही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

राज्यात कित्तेक दिवसांपासून मराठा आरक्षण मुद्दा हा धुमसत आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखिल निकाल दिला आहे. त्यावर आता राज्य सरकारकडून योग्य पावले उलण्यात येत आहेत. आता राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर पुण्यात नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली 34 गावं ही वगळण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर ही गावे वगळ्याचा डाव शिंदे-भाजप सरकारने केल्याचाही आरोप ही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. यावेळी कडू यांनी, खिसे कापून नंतर किराणा वाटणारे कमी लोकं नाहीत असं म्हटलं आहे. यादरम्यान भारत जोडो यात्रेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. यावेळी राणे यांनी तिघांना एकमेंकांच्या आधाराची गरज असल्याचे म्हटलं आहे.

 

Published on: Oct 18, 2022 08:04 PM
राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव, रोहीत पवार यांच्या आरोपासह पहा राज्यातील नव्या घडामोडी 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
फडणवीस यांची काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका, पहा काय म्हणाले, टॉप 9 न्यूजमध्ये