आज काय झालं कॅबिनेट बैठकीत? पहा नव्या अपडेटसह 25 महत्वाच्या बातम्या
भू-विकास बँकेच्या जागा खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याने चौकशी होणार आहे. याचे आदेश ही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर सातारा, जळगाव आणि औरंगाबादमध्ये याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
आज पारपडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महत्वाचे काही निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांनी ‘भू-विकास’ बँकेतून कर्ज घेतलेलं होतं. त्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर आज झालेल्या निर्णयानुसार 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर भू-विकास बँकेच्या जागा खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याने चौकशी होणार आहे. याचे आदेश ही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर सातारा, जळगाव आणि औरंगाबादमध्ये याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तर ज्या जागा खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याही सिल करण्यात येणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन आहिर यांनी ट्वीट करत याबाबत, भाजपच्या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचे म्हटलं आहे. तसेच भाजपच्या या कार्यक्रमात मराठी गायक राहुल देशपांडेंना बाजूला करत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.