सांगलीत रोहित पाटील आणि खासदार संजय काकांमध्ये काय सुरू आहे, पहा 25 महत्वाच्या बातम्यांमध्ये
महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तर जगताप या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.
सांगलीतील राजकारण सध्या धुमसताना दिसत आहे. येथे दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार लागल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी रोहित पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका केली आहे. छळ,कपट हे शब्द संजय काकांच्या तोंडून येणं योग्य नाही असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेनंतर RPI च्या सचिन खरात यांनी पडळकर यांच्यावर टीका केली आहे. खरात यांनी, पडळकर यांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या घरावर कोणता झेंडा लागेल हे पाहण्यापेक्षा आधी आपल्या घरावर चार झेंडे लागले आहेत ते पहावं असं म्हटलं आहे. तसेच तुमच्या घरावर आता शिंदे गटाचा झेंडा कधी लागणार ते ही सांगा असेही खरात यांनी म्हटलं आहे. तर महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तर जगताप या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. तसेच शिवसेनेचे नेते आणि ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर शिवसेनेच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच दिवाळी सुरू असून काही लंवंगी मिर्च्या तडतड करत आहेत. तसेच नार्वेकर शिंदे गटात जाणार हा भाजपचा फुसका बार असल्याचेही अंधारे म्हणाल्या.