अंधेरी पोटनिवडणुकीवरून सुरू झालेल्या वादाचे अपडेट पहा 25 महत्वाच्या बातम्यामध्ये
खासदार विनायक राऊत यांनी लटके यांना उमेदवारी मिळू नये म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरू होतं असा आरोप केला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटासह भाजपमध्ये चांगलीच तू तु मै मै होताना दिसत असतानाच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ याचं कौतूक केलं आहे. भुजबळ हे जर आज शिवसेनेत असते तर नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. जाताना ते एकटे गेले. तर येताना सोबात राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन आले असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तर शुन्यातून एखाद्याचा उदय कसा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे भुजबळ असल्याचं शरद पवार म्हणाले. तर भायखळ्यात भाजीचे दुकान चालवत भुजबळांनी ठाकरेंच्या सेनेत काम केलं असही पवार म्हणाले. तर ऋतुजा लटके यांच्यावरून सुरू झालेले वाद-विवाद सुरूच आहेत. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी लटके यांना उमेदवारी मिळू नये म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचे प्रयत्न सुरू होतं असा आरोप केला आहे. यादरम्यान प्रसाद लाड यांनी ऋतुजा लटके यांच्यावरून उद्धव ठाकरे याच्यावर टीका केली आहे. त्यांनी ऋतुजा लटके यांना तिकीट द्यायला विलंब का केला असा प्रश्न विचारला आहे.