समृद्धी महामार्गावर अग्नी तांडव, शिल्लक फक्त राख; 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

| Updated on: Jul 01, 2023 | 11:18 AM

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 ही खासगी ट्रॅव्हल्स बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ आली असता बसचा समोरील टायर अचानक निघाला आणि बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. ज्यामुळे खाजगी बसने पेट घेतला.

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर लोकार्पणनंतर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अपघात झाला. ज्यामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात सिंदखेडराजा नजीक खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन लागलेल्या आगीने झाला. तर पेटलेल्या खाजगी ट्रॅव्हल्समध्ये झोपलेल्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 ही खासगी ट्रॅव्हल्स बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ आली असता बसचा समोरील टायर अचानक निघाला आणि बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. ज्यामुळे खाजगी बसने पेट घेतला. तर बसमध्ये अग्नीतांडव झाला. ज्यात 25 जणांना जीव गमवावा लागला आहे. या बसमध्ये 32 प्रवासी होते. तर जे केबिनमध्ये काही प्रवाशी बसले होते. त्यांनी बाहेर उडी मारल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Published on: Jul 01, 2023 11:18 AM
…जेव्हा नगरमध्ये निलेश लंके आणि खासदार विखे येतात आमने सामने! लंके यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं पहा…
समृद्धी महामार्गावर भीषण बस अपघात; मृतांच्या कुटुंबांना 5 लाख; जखमींवर सरकार उपचार करणार : मुख्यमंत्री