परतीच्या पावसाचा कुठे बसला फटका? यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा 36 जिल्हे 72 बातम्या
सोलापूरमध्ये पावसाचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसला आहे. येथे अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे.
राज्यात परतीच्या पवसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही ठिकाणी दिलासा मिळत आहे. तर काही ठिकाणी नुकसानीला तोंडस द्यावे लागत आहे. पावसामुळे असेच नुकसान उस्मानाबादच्या भूम येथे पहायला मिळत आहे. येथे पावसाचा तडाखा सोयाबीनला बसला आहे. तर सोयाबीन पाण्यात गेल्याचे अनेक शेतऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर सोलापूरमध्ये पावसाचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसला आहे. येथे अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली आहे. तर सोलापूरमधील बार्शीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. ज्यामुळे लाखोलिटर पाणी वाया गेलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या अंधारे यांच्यावर भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी टीका केली आहे. तसेच मोदींवर टीका केल्यानं प्रसिद्धी मिळते असे त्या म्हणाल्या. तर गोंदियामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे. यावेळी घरकाम करणाऱ्या महिलांनी बेमुदत धरणं आंदोलन केलं. तसेच मानधन वाढीसह वेतन वाढिची मागणी या महिलांनी यावेळी केली.