अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश, पहा किती जागा मिळाल्या? 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये
यादरम्यान भंडाऱ्यात मात्र महिलाराज उदयास आले आहे. भंडाऱ्याच 19 पैकी 13 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले आहे.
राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळाली. यावेळी भाजप-शिंदे गटाला राज्यातील 342 तर महाविकास आघाडीला 355 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडवता आला आहे. तर 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत सगळ्यात मोठा गट ठरला आहे. तर हातात आलेल्या निकालावरून राज्यातील 230 ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलले आहे. राज्यात भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळत असतानाच अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश मिळाल्याचे समोर आले आहे. यावेळी 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये 274 जागांवर अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. यादरम्यान भंडाऱ्यात मात्र महिलाराज उदयास आले आहे. भंडाऱ्याच 19 पैकी 13 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले आहे. एकीकडे ग्रामपंचायत आणि दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सांगलीत मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ पहायला मिळत होती.