काय चाललंय आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात पहा फटाफट 36 जिल्हे 72 बातम्या
माझ्याविरोधातीस आरोपांमध्ये काही तथ्य नाही. उद्या राजीनामा स्विकारताच अंधेरी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर बीएमसीला झटका देत उद्या सकाळी 11 पर्यंत त्यांचा राजीनामा स्विकारा असे आदेशच न्यायालयाने दिला आहे. यादरम्यान न्यायालयाच्या सुनावणी वेळी बीएमसीचे वकील यांना ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपावर बोलताना, माझ्याविरोधातीस आरोपांमध्ये काही तथ्य नाही. उद्या राजीनामा स्विकारताच अंधेरी पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखिल ऋतुजा लटके यांच्या जामीनावर आलेल्या कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सत्याचा नेहमीच विजय होतो असे म्हटलं आहे. तर प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जावं लागतं. हिम्मत असेल तर मैदानात या असे आवाहन शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी आज दिलं. तर मी लढाईच्या क्षणांचीच वाट बघतोय असेही ते म्हणालेत