राज्यभरातल्या अढावा 36 जिल्हे 72 बातम्यामध्ये… पहा काय घडतयं आपल्या राज्यात
पुण्याच्या मार्केट यार्डमधील धान्य दुकानदारांही पावसाचा फटका बसलेला पहायला मिळत आहे. येथे पावसाचे पाणी दुकानाच्या गोडावूनमध्ये शिरल्याने किराणा साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं असतानाच शहरातील परिस्थिती काही वेगळी नाही. पुण्यात पावसाचा कहर सुरूच असून अनेक भागात पावसाचे पाणी साचलं आहे. पुण्यातील नवी पेठ गणपती सोसायटीच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी साठलं आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या रहिवाशांना वीज बंद करून घरातच राहावं लागतं आहे. दरम्यान पुण्याच्या मार्केट यार्डमधील धान्य दुकानदारांही पावसाचा फटका बसलेला पहायला मिळत आहे. येथे पावसाचे पाणी दुकानाच्या गोडावूनमध्ये शिरल्याने किराणा साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान पुण्याच्याच इंदापूर तालूक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे ओढ्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे. तर पुण्यात पावसाने अनेकांचे संसार हे उघड्यावर आले आहेत. त्यामुळे आदेशाची वाट न पाहता नुकसानग्रस्तांची मदत करा असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.