हा ड्रोन व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल! तब्बल 41 हजार दिवे अन् अहिल्यादेवींच थ्रीडी पेंडिंग

| Updated on: May 31, 2023 | 10:43 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात यावरून चढाओढ दिसत आहे. तर या वर्षी शासकीय जयंती कार्यक्रमाचे आयोजन भाजप आमदार राम शिंदे यांनी केलं आहे. तेच जयंती समितीचे अध्यक्ष आहेत. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासाठी चौंडी येथे येणार आहेत.

चौंडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी देखील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात यावरून चढाओढ दिसत आहे. तर या वर्षी शासकीय जयंती कार्यक्रमाचे आयोजन भाजप आमदार राम शिंदे यांनी केलं आहे. तेच जयंती समितीचे अध्यक्ष आहेत. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासाठी चौंडी येथे येणार आहेत. यादरम्यान रोहित पवार यांनी वेगळ्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना, चौंडी येथे 41 हजार दिव्यांच्या सहाय्याने पोट्रेट थ्रीडी पेंडिंग साकारले आहे. बीड येथील उद्देश या तरुणांने हे पेंटिंग साकारलं असून ते भव्य दिव्य असे आहे. पहा हा ड्रोन व्हिडीओ…

Published on: May 31, 2023 10:43 AM