Sidhu Moose Wala हत्येतील मारेकरी संतोष जाधववर पोलीस स्थानकात 4 गुन्हे दाखल, पोलिसांची माहिती
सिद्धू मुसेवाल याच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे न्यूज चॅनेलच्या बातमीवरुन समजलं. त्यामुळे आम्ही पोलीस माणसा पोलीस स्टेशन संपर्क साधला व त्याच्याकडून आम्ही माहिती घेतली आहे. संतोष जाधवचा आम्हीही शोध घेत आहोत, असे पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल शेळके यांनी सांगितले.
पुणे : संतोष सुनील जाधव मंचर पोलीस स्टेशन चार गुन्हे दाखल आहेत. संतोष 2021 पासून राजस्थान हरियाणा पंजाब या भागांमध्ये असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी पोलीस पथक राजस्थान बॉर्डरमध्ये जाऊन तपास करून पण आली होती परंतु आम्हाला तो मिळाला नाही. पुण्यामधील मंचर या ठिकाणी सध्या त्याची आई वास्तव्य करते आणि त्या ठिकाणी तो राहत नाहीये. त्याचं कुटुंब व त्याची पत्नी कोल्हापूर येथे असल्याचे माहिती आहे. बालगुन्हेगार सोबतच काम करत होता आणि त्यानंतरही बालगुन्हेगारांना हाताला धरून काम करत होता. पंजाब हरियाणा या भागांमध्ये काही गुन्हे केल्याची माहिती आहे. सिद्धू मुसेवाल याच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे न्यूज चॅनेलच्या बातमीवरुन समजलं. त्यामुळे आम्ही पोलीस माणसा पोलीस स्टेशन संपर्क साधला व त्याच्याकडून आम्ही माहिती घेतली आहे. संतोष जाधवचा आम्हीही शोध घेत आहोत, असे पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल शेळके यांनी सांगितले.