हृदयद्रावक घटना : विहिरीवर काम करणाऱ्या मजूरांवर काळाचा घाला, काँक्रिटचा भाग कोसळून भीषण अपघात

| Updated on: Aug 02, 2023 | 2:52 PM

येथे विहिरीला काँक्रिटकरण करत असताना काँक्रिटचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. तर १२० फुट खोल विहिरीत 4 मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफ आणि पोकलँडच्या मदतीने मजूरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पुणे, 2 ऑगस्ट 2023 | जिल्ह्यातील इंदापूर येथे विहिरीवर काम करत असताना भीषण अपघात झाल्याचे उघड झाले आहे. येथे विहिरीला काँक्रिटकरण करत असताना काँक्रिटचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. तर १२० फुट खोल विहिरीत 4 मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफ आणि पोकलँडच्या मदतीने मजूरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील मासोबावाडी गावात घडली असून सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक काँक्रिटचा भाग विहिरीत पडला. ज्यामुळे काम करणारे ४ मजूर ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण हे विहिरीत काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रात्री उशाराही हे मजूर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. जे रात्रभर सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे घटनास्थळी दाखल झाले.

Published on: Aug 02, 2023 02:52 PM
यशोमती ठाकूर धमकी प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द; म्हणाले, “दोषींवर कारवाई होणार”
संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण चिघळलं; चव्हाण यांचा थेट सवाल? ‘हा माणूस भाजपनं पेरला आहे का?’