सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही. आमचं सरकार राज्यात पुन्हा येईल- फडणवीस असं का म्हणाले? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 15, 2022 | 8:19 PM

अजित पवार यांच्या भाकीतानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही. आमचं सरकार राज्यात पुन्हा येईल असंही फडणवीस म्हणाले.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. यावेळी ठाकरे-शिंदेंमध्ये राज्यातील सध्य राजकीय घडामोडींसह अंधेरी पोटनिवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती. तर शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार असे भाकीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलं आहे. तर शिंदे गटातील काही आमदार हे नाराज आहेत. जो पर्यंत 145 संख्याबळ आहे. तोपर्यंतच हे सरकार आहे, असेही पवार म्हणाले. तर अजित पवार यांच्या भाकीतानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही. आमचं सरकार राज्यात पुन्हा येईल असंही फडणवीस म्हणाले. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या उमेदवारी विरोधात उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाणार आहे. तसेच अंधारात तीर मारणाऱ्यांमुळेच मूळ शिवसैनिकांचे वांदे होत असल्याची टीका मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली आहे.

 

Published on: Oct 15, 2022 07:34 PM
किशोरी पेडणेकर यांनी कोणाचा चिमटा काढला? काय म्हणत पलटवार केला शालिनी ठाकरेंवर, पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये
एकनाथ खडसेंची महाजनांवर टीका, पहा काय म्हणाले खडसे, यासह इतर बातम्या पहा 25 महत्वाच्या बातम्या