शेतकऱ्यांच्या मदतीवर तापलेल्या राजकारणासह पहा नव्या घडामोडी 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
शिंदे सरकावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तोड डागली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीवर फक्त घोषणांचा पाऊस. अजून पंचनामेही नाहीत असा घणाघात थोरात यांनी केला आहे.
परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास नेला. त्यामुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं आहे. भू-विकास बँक प्रकरणी शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता टीका केली आहे. तसेच पवार यांनी लबाडांचं आवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही असेही ते म्हणाले. तर भू-विकास बँकची कर्ज वसूली होणार नसल्यानेच कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला असेही ते म्हणाले. तर शिंदे सरकावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तोफ डागली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीवर फक्त घोषणांचा पाऊस. अजून पंचनामेही नाहीत असा घणाघात थोरात यांनी केला आहे. तर फक्त देखावा करण्यासाठी दौरा असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव यांना विरोधी पक्षनेते करावे असे म्हणटं आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर ठाकरे बांधावर गेले पाण शेतात गेले नाहीत असे राणा म्हणाल्या.