राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव, रोहीत पवार यांच्या आरोपासह पहा राज्यातील नव्या घडामोडी 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
राज्यातील मराठा आरक्षणासाठी राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. याबाबत मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दिली. ते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर बोलत होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर नागपूर रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 472 कोटी रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच मुंबईच्या धारावी पुनर्विकासाचा प्रश्न ही मार्गी लागत असल्याचे सांगताना फडणवीस यांनी रेल्वेची जागा मिळाल्याचेही सांगितले. शिवसनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपचे पुढचे टार्गेट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचेही आरोप पवार यांनी केला आहे. त्यांनी हा आपोर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवत, गद्दारांना गाडून ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला असे म्हणत राजन साळवी यांचे कौतूक केलं आहे. राज्यातील मराठा आरक्षणासाठी राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. याबाबत मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात होणार आहे. त्यासाठी दिवाळी आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.