अनिल देशमुख यांच्यासह संजय राऊत यांच्या जामिनाचे अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 21, 2022 | 6:35 PM

आरोग्य विभागाची मेगा भरतीची घोषणा झाली आहे. आरोग्य विभागात 10 हजार जगांसाठी भरती निघणार आहे. तर याची परिक्षा 25 आणि 26 मार्चला होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामिन न्यायालयाने फेटाळला आहे. देशमुख यांचा सीबीआय गुन्ह्यातील जामिन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुख यांना तुरूंगातच राहाव लागणार आहे. याचदरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कथित पत्रा घोटाळा गुन्हातील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. तर परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास हिरावून नेला. यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील 15 दिवसांत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येईल असे आश्वासन दिलं आहे. तर आरोग्य विभागाची मेगा भरतीची घोषणा झाली आहे. आरोग्य विभागात 10 हजार जगांसाठी भरती निघणार आहे. तर याची परिक्षा 25 आणि 26 मार्चला होणार आहे. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यात धाक राहिला नाही. त्यामुळे मी ही ठाकरे यांना घाबरत नाही असे सत्तार यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार भूयार यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का लागला तर तलवारीनं हात छाटू असं म्हटलं आहे.

 

Published on: Oct 21, 2022 06:35 PM
दिवाळी कीटसह नुकसान भरपाईच्या बातम्यांचा घ्या आढावा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
नुसकसान भरपाई, अरोग्य विभागात मेगा भरतीसह दिवाळी कीटबाबत पहा बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यामध्ये