उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? कोणाचा होणार दसरा मेळावा भव्य?
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला भाजपचे नेते येणार असल्याची चर्चा होती. शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी आणि अमित शाह येतील असे बोलले जात होते. मात्र या मेळाव्याला यांच्यासह भाजप नेते येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
दसरा मेळाव्यावरून राज्यात सध्या राजकीय तापमान वाढलेलं आहे. तर कोणाचा दसरा मेळावा मोठा होणार? किती गर्दी जमणार यावरून लोकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. यादरम्यान शिवाजीपार्कवर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. तर धनुष्यबाण हे आपलं असल्याचं सांगण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न होईल. दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला भाजपचे नेते येणार असल्याची चर्चा होती. शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी आणि अमित शाह येतील असे बोलले जात होते. मात्र या मेळाव्याला यांच्यासह भाजप नेते येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर दसरा मेळाव्यावरून राज्यात कटूता वाढू नये म्हणून प्रयत्न करा. असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि शिंदे यांना सल्ला दिला आहे. दसरा मेळाव्यापूर्वी राज्यात कॅबिनेट बैठक होणार आहे. तर आजच्या या बैठकीत मोठे निर्णय ही होण्याची शक्यता आहे. तर अंधेरी पोट निवडणूकीत शिंदे गटाने उमेद्वार न दिल्यास उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळू शकेल असे कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी म्हटलं आहे.