ऋतुजा लटकेच विजयी होतील : आदित्य ठाकरे असे का म्हणाले यासह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
शिवसेनेच्या ऋतुजा लटकेच विजयी होतील. तर लटकेंच्या राजीनाम्यावरून खोके सरकारनं घाणेरडं राजकारण केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरूद्ध भाजप असा थेट सामाना पहायला मिळणार आहे. तर यानिवडणुकीत पहिल्यांदाच भाजपच्या कमळला धनुष्यबाण नाही तर मशाल लढत देणार आहे. यावेळी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज भरताना भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. तर यानिवडणुकीत आपला विजय नक्की आहे असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने देखिल ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीती मित्र पक्षाचे देखिल नेते हजर होते. या रॅलीमध्ये काँग्रेसचे भाई जगताप सहभागी झाले होते. तर शिवसेनेच्या ऋतुजा लटकेच विजयी होतील. तर लटकेंच्या राजीनाम्यावरून खोके सरकारनं घाणेरडं राजकारण केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तर ठाकरेंची मशाल विझवल्याशिवाय राहणार नाही असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर साधला आहे.