दिवाळी कीट, भास्कर जाधव यांचा सरकारवर हल्ला, फोन टॅपिंग प्रकरण यासह पहा इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्स
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना राज्य शासनाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात चालविण्याच्या खटल्याला राज्य शासनाने मनाई केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाजावाजा केलेल्या दिवाळी कीटचा पुरता बोजारा उडाला आहे. राज्यातील अनेक भागात अद्यापही दिवाळी कीट पोहचलेले नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना खाली हातांनीच घरी परताव लागत आहे. याच दरम्यान दिवाळी कीटवरून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिवाळी कीट सर्व ठिकाणी पोहचवणं हे अडचणीचं आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी हे कीट पोहचविण्यात वेळ लागत असल्याचेही म्हटलं आहे. तर शिधा पोहचविण्यासाठी रेशन यंत्रणा काम करत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील राजकारण हे चांगलेच तापले. त्यानंतर जाधव यांनी शिंदे सरकारवर हल्ला चढवताना, सुरक्षा काढून घेतल्यानंतर आपल्या घरावर हल्ला झाल्याचे म्हटलं आहे. तसेच जर आपल्याला काही झालं तर त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना राज्य शासनाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात चालविण्याच्या खटल्याला राज्य शासनाने मनाई केली आहे. एककीडे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. तर दुसरी कडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती नसल्याचे म्हटलं आहे. तर झालेल्या नुकसानीचं पंचनामा करण्याच्या सुचना केल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.