4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 29 September 2022 -TV9
शिवसेना उभारणी देण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. त्या ठाण्यातील ठेंबी नाक्यावर जात देवीची पूजा करणार आहेत. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो.
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांची सुनावणी आज होण्याची शक्यता आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि थेट नगराध्यक्षाबाबत सुनावणी होणार आहे. दरम्यान दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. ठाकरेंकडून दिड ते दोन लाख तर शिंदे गटाकडून तीन लाख लोक जमावण्याचं टार्गेट आखण्यात आलं आहे. तर शिवसेना उभारणी देण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. त्या ठाण्यातील ठेंबी नाक्यावर जात देवीची पूजा करणार आहेत. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. तर रश्मी ठाकरे यांच्या या दौऱ्याने त्यांच्यावर शिंदे गटातील शितल म्हात्रे यांनी टीका केली आहे. म्हात्रे यांनी गर्दीसाठी ठाकरेंचा खटाटोप असा टोला हानला आहे. तर काल केलेल्या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तर शाळेतून सरस्वतीचे फोटो काढणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. तर नाशिकमधल्या इगतपूरीमध्ये पावसाने दमदार बॅटींग केल्याने परिसर हा जलमय झाला आहे.