4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 September 2022 -TV9

| Updated on: Sep 29, 2022 | 1:57 PM

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या राज्यातील दौऱ्यानंतर पुन्हा सत्ता येते असं म्हटलं आहे.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यानंतर शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हात असल्याचे बोलले जात होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या राज्यातील दौऱ्यानंतर पुन्हा सत्ता येते असं म्हटलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपला उत्साह वाढवला आहे. तर या निकालाने अनेकांचे धाबे दणाणले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे तेथे होते असा गौप्यविस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हे पूणे दौऱ्यावर असणार आहेत. ते 4 ऑक्टोंवरला पुण्यात मनसेचे पदाधिकारी यांची भेट घेत चर्चा करणार आहेत.

 

Published on: Sep 29, 2022 11:02 AM
मुंबईतलं CSMT स्टेशन नवं रुप घेणार, पहा कसं असेल?
आमदार निवासाच्या बदल्यात आमदारांना अव्वाच्या सव्वा भाडे, तरी म्हणतायेत भाडे वाढवा